आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीजवळच्या कॅनोलमध्ये तरंगत होता महिलेचा मृतदेह, पतीने सांगितले हे कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-आैरंगाबाद रोडवर घोडगावात असलेल्या मुळा कालव्यात हा मृतदेह सापडला. - Divya Marathi
नगर-आैरंगाबाद रोडवर घोडगावात असलेल्या मुळा कालव्यात हा मृतदेह सापडला.
अहमदनगर - नगर-औरंगाबाद रोडवर घोडगावात असलेल्या मुळा कालव्यात बुधवारी स्थानिकांनी एका महिलेचा तरंगता मृतदेह पाहिला. डेड बॉडी पाहून स्थानिकांची भंबेरी उडाली. त्यांनी वेळीच पोलिसांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर संबंधित महिलेचे नाव अश्विनी अजय मुळे (वय 22, पुणे) असल्याचे समोर आले. 48 तासांपूर्वी तिने आपल्या पतीसोबत साई दर्शन घेतले होते. तेथूनतच परत येत असताना कॅनॉलजवळ तिचा पाय घसरला असा दावा पतीने केला आहे. 
 

पीडितेचा पती म्हणाला...
- अश्विनी गृहिणी असून तिचा पती अजय जिममध्ये इस्ट्रक्टर म्हणून काम करतो. दोघे शुक्रवारी दुपारी हडपसरहून बसने शिर्डीला गेले. 
- दोन दिवस त्यांनी तेथेच मुक्काम केला. देवदर्शन केल्यानंतर शिर्डीतच ते राहिले. सोमवारी सकाळी ते शनिशिंगणापूरला आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दर्शन आटोपून ते घोडेगावात आले. 
- सायंकाळी घोडेगाव चौफुल्यावर त्यांनी जेवण केले. तेथून जवळच असलेल्या कॅनॉलच्या पुलावर ते गेले. अश्विनी पुलाच्या कठड्यावर चढून त्यावर बसायला लागली असता तिचा तोल जाऊन ती खाली पडली.
 

48 तासांनंतर सापडला मृतदेह
- पत्नी कॅनोलमध्ये पडताच पती अजयने आरडा-ओरड सुरू केली. तसेच स्थानिकांना आणि स्थानिकांनी पोलिसांना बोलावले. 
सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अश्विनी कॅनॉलच्या पाण्यात पडली होती. 
- बुधवारी दुपारी तिचे प्रेत भेंडे शिवारात कॅनॉलमध्ये तरंगत असल्याचे काही नागिरकांनी पाहिले. ही बाब समजल्यानंतर पोलिस व नागरिकांनी तेथे धाव घेतली. पाण्यात बुडून अश्विनीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
 
4 वर्षांपूर्वी झाला होता प्रेम विवाह
अश्विनी व अजयचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला होता. तिचे माहेर उस्मानाबादचे असून अजयसोबत तिची पुण्यात ओळख झाली होती. नंतर दोघांनी विवाह केला. ती कॅनॉलमध्ये पडल्याचे समजल्यानंतर तिचा भाऊ, त्याचे काही मित्र व अजयचा भाऊही घोडेगावात दाखल झाले होते. सोनई पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...