आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirur Toll Naka Issue Mumbai Highocurt Gives Clean Chit To Bhujbal

शिरूर टोल नाकाप्रकरणी मुंबई हायकोर्टाची भुजबळांना 'क्लीन चिट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील टोलनाक्या संदर्भात संजय पाचंगे यांनी केलेल्या खोट्या आणि निराधार आरोप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री छगन भुजबळ तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील 17 अधिका-यांना 'क्लीन चिट' दिली आहे.
या प्रकरणी निर्णय देताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि, संजय पाचंगे यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या खात्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील याचिका खारीज करण्यात येत आहे. या खटल्यात वरिष्ठ वकील अॅड. ढाकेफाळकर आणि आर. बी. मोकाशी यांनी भुजबळांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.
सामाजिक कार्यकर्ते पाचंगे याने भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव तसेच अन्य 17 अधिका-यांविरुद्ध शिरूर येथील टोल नाक्याबाबत भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. त्यामध्ये बेकायदेशीररीत्या टोल वसुली करणे, रस्ता बांधणी व टोल वसुली संदर्भात बेकायदेशीर निविदा काढणे, झाडांची अवैधपणे कत्तल करणे, शिरूर येथे झालेल्या दंगलीला जबाबदार असणे आदी आरोप केले होते. मात्र, पाचंगे यांनी केलेले सर्व आरोप हे पोलीस अहवालात निराधार असल्याचे निष्पन्न झाले होते असा निष्कर्ष कोर्टाने काढला आहे. पोलिसांचा अहवाल ग्राह्य धरून मुंबई हायकोर्टाने सदर याचिका खारीज करीत फेटाळून लावली तसेच ती शिरूर पुन्हा शिरूरमधील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केली आहे.