आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Bjp Exchanged Its Loksabha's Baramati Satar Constituncy

बारामती-सातार्‍यात युतीची लोकसभेसाठी अदलाबदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भाजप-शिवसेना युतीत गेल्या वेळी बारामती लोकसभेची जागा भाजपने, तर सातार्‍याची जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र, आता या जागांची दोन्ही पक्ष अदलाबदल करण्याच्या तयारीत आहेत. ‘बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तेथील मतदार नाराज असून शिवसेनाला त्या ठिकाणी जिंकण्यास वाव आहे. आगामी निवडणुकीत ‘जाणता राजा’च्या लेकीस शिवसेना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धार शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कीर्तिकर म्हणाले, बारामती, शिरूर, पुणे व मावळ या लोकसभा मतदारसंघांत महायुतीने 15 विधानसभा सदस्य निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या सदर मतदारसंघात युतीचे सात आमदार असून भोर,वेल्हा, जुन्नर, खेड-आळंदी, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ महायुतीला पोषक आहे. बारामती लोकसभेसाठी आमदार विजय शिवतारे इच्छुक असून त्याबाबत वरिष्ठ स्तरावर विचार सुरू आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या अंतिम तिकीट वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते चर्चा करून घेतील.
‘आजच्या नेतृत्वाला फाइलवर सही करताना लकवा भरतो का?’ अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना कीर्तिकर म्हणाले, जनतेच्या मनात जे होते तेच पवार बोलले. कासवगतीने राज्यात काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.