Home »Maharashtra »Pune» Shiv Sena Car Accident In Baramati Two Student Girl Dead

शिवसेना तालुकाप्रमुखाच्या गाडीने दाेन मुलींना चिरडले; बारामतीजवळील घटना

प्रतिनिधी | Oct 13, 2017, 00:24 AM IST

बारामती-परीक्षेसाठी शाळेकडे जाणाऱ्या तीन विद्यार्थिनींना शिवसेना पदाधिकाऱ्याच्या भरधाव गाडीने जाेराची धडक दिली. यात दाेघींचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाली. बारामती- मोरगाव राज्य महामार्गावरील कऱ्हावागज गावालगत गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मात्र ,जखमींना रुग्णालयात नेण्याएेवजी त्याने गाडी साेडून पळ काढला. दरम्यान, संतप्त जमावाने अपघातग्रस्त गाडीची ताेडफाेड करून ती पेटवून दिली.

दिव्या ज्ञानेश्वर पवार (१३ ), समीक्षा मनोज विटकर (१२) अशी मृतांची नावे अाहेत. पायल संजय लष्कर ही जखमी झाली. या तिघी गुरुवारी अंजनगाव (ता. बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात पायी जात हाेत्या. या वेळी समाेरून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. दरम्यान, या वेळी कारचा मालक व शिवसेनेचा तालुकाप्रमुख पप्पू माने गाडीत हाेता की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात अाहेत. दरम्यान, पाेलिस ठाण्यात फरार चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते तेव्हा माने पाेलिस ठाण्यातच बसून हाेता.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
अपघातानंतर मानेच्या कारमधील पृथ्वीराज चव्हाण याने गाडीची नंबर प्लेट फाेडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी त्याला चाेप देत गाडी पेटवून दिली. कारवर शिवसेनेचे चिन्ह आहे. दरम्यान, अाराेपीला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता राेकाे अांदाेलन केले. या गाडीत अाकाश बाळासाहेब जगताप व ऋषिकेश सुभाष चौधरी हे दाेघे हाेते. इतर दाेघांना मी अाेळखत नसल्याचे त्याने जमावाला सांगितले.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेचा व्हिडिओ

Next Article

Recommended