आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या माजी अामदाराने घर बळकावल्याची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवसेनेचे माजी अामदार प्रकाश देवळे व उद्याेजक सपना लालचंदानी यांनी एका गरीब दांपत्याचे घर बळकावले अाहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली अाहे. न्याय न मिळाल्यास कुटुंबासह मंत्रालयासमाेर अात्महत्या करण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले असल्याची माहिती छाया गिर्दराज पीटर या महिलेने साेमवारी पत्रकार परिषदेत िदली.

सुलाेचना सुंदरलाल रजपूत व वंदना देवेंद्र सध्दय्या या महिलांनी ही अापल्यावर अशाचप्रकारे अन्याय झाल्याचे सांगितले. याप्रकरणी शिवाजीनगर पुणे िदवाणी न्यायालयात २०१२ मध्ये तक्रारी दाखल करण्यात अाल्याची माहिती त्यांनी िदली. वडगाव शेरी येथील सर्व्हे नं.२९ रामवाडी याठिकाणी द्वारकाबाई देवकर यांच्या चाळीतील खाेलीत पीटर दांपत्य मागील ४२ वर्षांपासून राहत हाेते. घरमालकाने सदर वाडा देवळे व लालचंदानी यांना विकसित करण्यासाठी िदला. सन २०१२ मध्ये देवळे व लालचंदानी यांनी बळजबरीने घरात घुसून, पीटर यांना बाहेर काढले. पीटर यांनी लालचंदानी यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी ‘तुम्हाला जागेच्या बदल्यात २५ लाख रुपये देऊ’ असे सांगत एक लाख रुपयांचा चेक िदला. राहिलेले २४ लाख रुपये नंतर देऊ असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात अद्यापर्यंत उर्वरित पैसे मिळालेेले नसून याबाबत येरवडा पाेलिस ठाण्यात देवळे व लालचंदानी यांच्याविराेधात िफर्याद देण्यात अालेली असल्याचे पीटर यांनी सांगितले.