आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशक्ती संगमच्या नेत्रदीपक सोहळ्याचे पाहा LIVE PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जय जय राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामच्या गजरात शिवशक्ती संगम स्थानी सकल संत गाथा पालखी, घोडेस्वार, भालदार व चोपदार समवेत 800 वारकरी असणारी भव्य वारकरी दिंडी जयघोषात प्रविष्ट झाली आहे. - Divya Marathi
जय जय राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामच्या गजरात शिवशक्ती संगम स्थानी सकल संत गाथा पालखी, घोडेस्वार, भालदार व चोपदार समवेत 800 वारकरी असणारी भव्य वारकरी दिंडी जयघोषात प्रविष्ट झाली आहे.
पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आज हिंजवडीजवळील मारुंजी- नेरे- जांबे या तीन गावांच्या सीमेवर होत असलेल्या 'शिवशक्ती संगम' कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमासाठी सात जिल्ह्यांतील एक लाख 60 हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. तसेच सामान्य नागरिकांनाही हा कार्यक्रम खुला असल्याने हा आकडा दोन लाखांहून अधिक असेल अशी माहिती संघाच्या कार्यकर्त्यांनी दिली. पुण्यात अनेक वर्षानंतर म्हणजे 1983 नंतर शिवशक्ती संगमचा मेळा भरत असल्याने हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्याचा मानस संघाचा आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी यांच्यासह संघाचे अनेक नेते मार्गदर्शन करणार आहेत.
आजच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे सकाळपासूनचे लाईव्ह फोटो पाहा, पुढे स्लाईडद्वारे...
बातम्या आणखी आहेत...