आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशक्ती संगम: ज्ञानज्योती सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त फुले दांपत्याला अभिवादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना अखिल भारतीय सेवा कार्यप्रमुख सुहासराव हिरेमठ... - Divya Marathi
क्रांतीसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना अखिल भारतीय सेवा कार्यप्रमुख सुहासराव हिरेमठ...
शिवशक्ती संगम स्थळ, मारूंजी, पुणे- सामाजिक चळवळीचे प्रणेते महात्मा फुले यांनी स्वीकारलेल्या समाज उद्धाराच्या ध्येयकार्याशी त्यांच्या पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई यांनीही समरस होऊन आपल्या जीवनाचे तेच ध्येय स्वीकारले आणि आयुष्यभर त्या कार्यरत राहिल्या असे प्रतिपादन अखिल भारतीय सेवा कार्यप्रमुख सुहासराव हिरेमठ यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित शिवशक्ती संगम या कार्यक्रमात सावित्रीबाई यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांचे वंशज नितीन, दत्ता आणि रितेश फुले, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, विनायक थोरात आणि प्रा. अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना हिरेमठ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'शिवशक्ती संगम' महाशिबीर आणि सावित्रीबाई यांची जयंती एकाच दिवशी जुळून येणे हा अपूर्व असा योगायोग आहे. अतिशय प्रतिकूल अशा कालखंडात सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचे अतिशय कठीण असे कार्य सुरु केले. समाजाने केलेल्या टीकेकडे लक्ष न देता त्यांनी आपली वाटचाल सुरूच ठेवली. त्या स्वतः प्रथम साक्षर झाल्या आणि समाजाला साक्षर केले. कोणत्याही पवित्र कार्यास अडचणी येतच असतात, पण त्या सर्व अडचणीवर मात करून ज्यांनी ज्यांनी मार्ग काढले त्यांनी आपापले कार्य तडीस नेले. सावित्रीबाई यांनी समाजजीवनाला जास्त महत्व देत दांपत्य जीवनास दुय्यम स्थान दिले. आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी आपले अवघे जीवन अर्पण केले असेही ते म्हणाले.

फुले यांचे वंशज ‘संघ गणवेशात’-
महात्मा फुले यांचे वंशज (खापरपणतू) नितीन, दत्ता आणि रितेश फुले हे संघाच्या संपूर्ण गणवेशात उपस्थित राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...