आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्डिलेंची बडदास्त संपली, आता बडगा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नगरमधील डॉक्टरची फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली अटकेत, परंतु उपचारासाठी रुग्णालयात असलेल्या भाजप आमदार शिवाजी कार्डिले यांचा ससूनमधील पाहुणचार संपला आहे. गुरुवारी त्यांची पुन्हा येरवडा तुरुंगात रवानगी झाली आहे.
13 दिवसांपासून कार्डिले यांच्यावर उपचार सुरू होते. या काळात वकिलाशिवाय कोणालाही भेटण्याची परवानगी नसतानाही आपल्या राहुरी मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी राजरोसपणे कार्डिले यांची भेट घेत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत तेथे चर्चाही झडत होत्या. सर्वसाधारण वॉर्डमध्ये दाखल केलेल्या कार्डिलेंची ससूनच्या व्यवस्थापनाने खास बडदास्त ठेवत डॉक्टरांसाठी असलेल्या खोलीत त्यांच्यावर उपचार सुरू होते.