आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोरवडेश्वर डोंगराच्या दरीतील मृतदेह काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला 2 तासांच्या प्रयत्नानंतर यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मावळ तालुक्यातील घोरवडेश्वर डोंगराच्या दरीत असलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा एक बूट 50 फुटावर आढळला आहे. साधारण चार दिवसापूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र मृत्यू दरीत पडल्याने झाला का अन्य कसा याचे गूढ कायम आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने हा मृतदेह बाहेर काढला.
 
तळेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिघावकर यांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला याबाबतची माहिती दिली होती. घोराडेश्वर मंदिराजवळ दरीत 60-70 फुट खाली दरीत एक मृतदेह असल्याचे त्यांनी या टीमला सांगितले. त्यानंतर आज सकाळी 10 वाजता हा मृतदेह तेथून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. सर्वप्रथम प्रविण देशमुख, योगेश उंबरे, सुनिल गायकवाड हे युवक खाली उतरले. 

मृतदेह पूर्ण कुजलेला होता. वजनही खुप जास्त होते व बांधायलाही नीट जागा नव्हती. अशा स्थितीत त्यांनी हा मृतदेह व्यवस्थित बांधून दुपारी 12 च्या सुमारास बाहेर काढला. 
शिवदुर्गच्या महेश मसने, अशोक उंबरे, विकास मावकर, अजय शेलार, प्रविण देशमुख, रोहित वर्तक, शिवम आहेर, अमोल परचंड, योगेश उंबरे, सुनिल गायकवाड या सदस्यांनी ही कामगिरी पार पाडली. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...