आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : शिवाजी महाराजांना कधीच जिंकता आले नाही आपले जन्‍मस्‍थळ; वाचा कसे..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज महाराष्‍ट्राचे भूषणच. त्‍यांनी केवळ स्‍वराज्‍य राज्‍य केले नाही तर तर चारशे शतकांपासून प्रत्‍येक मराठी काळजावर ते अधिराज्‍य गाजवत आहेत आणि येणा-या हजारो वर्षांपर्यंत गाजवत राहतील. अशा या महानविभूतीचा जन्‍म शिवनेरी किल्‍ल्‍यावर झाला. पण, महाराजांच्‍या जन्‍मानंतर 1637 मध्‍ये हा किल्‍ला मोगलांच्‍या ताब्‍यात गेला. त्‍यानंतर शिवाजी महाराजांना त्‍यावर कधीच विजय प्राप्‍त करता आला नाही.
1650 मध्ये मोगलांविरूद्ध किल्‍ल्‍यावर राहणा-या कोळ्यांनी बंड केले होते. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. 1673 मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न शिवाजी महाराजांनी केला. इ.स. 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला. मात्र, अपयश पदरात पडले. पुढे 38 वर्षांनंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.
शिवाजी महाराजांचा जन्‍म
पुण्‍यापासून 105 किमी अंतरावर असलेल्‍या जुन्नर गावाजवळ शिवनेरी किल्‍ला आहे. तो प्राचिन किल्‍ल्‍यापैकी एक आहे. या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा कसे आहे किल्‍ल्‍याचे बांधकाम...
बातम्या आणखी आहेत...