आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsangram Association President Vinayak Mete Comment On Maratha Community

आरक्षणाला मराठ्यांचा अडसर; शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटेंची टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘मराठा आरक्षणाला आपल्याच लोकांकडून विरोध सुरू आहे. मुंडे- भुजबळ- आठवले यांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. मात्र सरकारमधले ‘आपलेच’ लोक, मंत्री मात्र आरक्षणावरून टीका करतात. त्यामुळे आरक्षणाची लढाई ‘आपल्याच’ लोकांविरुद्ध लढावी लागेल,’ असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते व राष्‍ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी रविवारी दिला.
किल्ले शिवनेरीवरच्या शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही संघटना समाजस्वास्थ्य बिघडवत असल्याची टीका केली होती. याचा उल्लेख करीत मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘मराठा आरक्षणाकडे वेळेत लक्ष न दिल्यास राज्याचे स्वास्थ्य बिघडेल,’ असे ते म्हणाले. रविवारी पुण्यात झालेल्या शिवसंग्राम संघटनेच्या बारावा वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, कार्याध्यक्ष राजाभाऊ ठाकरे, उपाध्यक्ष माजी आमदार वसंतराव शिंदे या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार आणि पत्रकार मुरलीधर शिंगोटे यांना मेटे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात मेटे यांची संघटनेचे राष्‍ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
मेटे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेळकाढूपणा करणाºया शासनाचा निषेध करतो. आम्हाला कोणीही गृहीत धरू नये. वेळ पडल्यास सरकारच्या विरोधात जाऊ. राजस्थानमधील गुजर समाजाप्रमाणे आंदोलन करण्याची वेळ आल्यास प्रसंगी रस्त्यावरसुद्धा उतरू,’ असा इशाराही त्यांनी दिला. संघटनेच्या आगामी कार्यक्रमाची पंचसूत्री मेटे यांनी जाहीर केली. मराठा समाजाला ओबीसीत 25 टक्के आरक्षण द्यावे, शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाचे किमान भूमिपूजन येत्या शिवजयंतीपर्यंत व्हावे, खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांना संपूर्ण शिक्षण मोफत करावे या प्रमुख मुद्द्यांचा यात समावेश आहे.