आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Activsit Ink Spread On Minister Thorat At Sangamner

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांवर शाईफेक, शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात)
संगमनेर- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शाईफेक करण्यात आली. शाई फेकणारा कार्यकर्ता हा शिवसेनेचा असून, त्याने शाई का फेकली याचे कारण स्पष्ट झाले नाही. भाऊसाहेब हसे असे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेनंतर बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी शिवसेना कार्यालयाची तोडफोड केली असून सध्या तेथे रास्ता रोको करण्यात येत आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील राजापूर गावात काही विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या भाऊसाहेब हसे नावाच्या व्यक्तीने थोरात यांच्या अंगावर शाई फेकली. शाई फेकताच हसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याने शाईफेक का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
या घटनेच्याविरोधात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी तेथील शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तसेच थोरातांच्या समर्थकांनी संगमनेर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. मंत्री थोरात यांनी आपल्या समर्थकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. ही शाईफेक राजकीय प्रेरित असून याकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याचे आवाहन थोरात यांनी केले आहे. तरीही समर्थक शांत होत नसल्याचे चित्र आहे.