आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या तीन महिला नगरसेविकांची हकालपट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेतून तीन विद्यमान नगरसेविकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शारदा बाबर, सीमा सावळे आणि आशा शेंडगे अशी या नगरसेविकांची नावे असून त्या खासदार गजानन बाबर गटाच्या होत्या. शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार यांनी आज पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. या तिघीही शेकाप-मनसेचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचे काम करीत होत्या. यापूर्वी बाबर यांनी पक्षातून बाहेर पडताच त्यांचे समर्थक सारंग कामतेकर आणि रोमी संधू यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या सर्वांनी मनसेत प्रवेश केला आहे. आता या नगरसेविकांही मनसेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षातून बंडाळी असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक लक्ष्मण जगताप यांचे तर काही जण श्रीरंग बारणे ( जगताप विरोधक नगरसेवक) यांचे काम करीत आहेत. काहींना जगतापांना निवडून आणायचे आहे तर काहींना जगतापांना पाडायचे आहे त्यामुळे अनेक नगरसेवक सोयीने भूमिका घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यामागे पक्ष म्हणावा तसा मागे नाही.
गजानन बाबर यांना शिवसेनेने तिकीट न दिल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. आजही ते शिवसेनेत असले तरी जगताप यांचे काम करताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने थेट व आक्रमक भूमिका या तीन नगरसेविकांची हकालपट्टी केली आहे. या नगरसेविका बाबर यांच्या गटातील असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती स्थानिक नेतृत्त्वाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याला उद्धव यांनी परवानगी देताच शशिकांत सुतार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सावळे, बाबर व शेंडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.