आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Help To Minor Girl Who Attempt To Suicide

छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या मुलीच्या उपचारासाठी शिवसेनेची मदत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- परिसरातील तरूणांकडून सातत्याने होण-या छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या भोसरीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या उपचारासाठी शिवसेनेच्यावतीने 25 हजारांची मदत देण्यात आली आहे. तसेच मुलीच्या उपचारासाटी आवश्यक ती मदत देण्याचीही आमची भूमिका आहे असे शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात सदर अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळीच पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने तिला रूग्णालयात दाखल केले होते. सध्या तिच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. तसेच सध्या मुलगी अद्याप कोमात असल्याने तिच्यावर चांगल्या दर्जाचे उपचार आवश्यक आहेत. त्यामुळे शहरातील अत्याधुनिध आदित्य बिर्ला रूग्णालयात उपचार करण्यासाठी सुलभा उबाळे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग शिवसेनेच्या वतीने 25 हजारांची मदत जाहीर केली आहे.