आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Mp Shrirang Barne Got Sansad Ratna Awards

मावळमधील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंना संसदरत्न पुरस्कार प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयटी मद्रास (चेन्नई) येथे झालेल्या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉ. ए. आर. लक्ष्मणन यांच्या शुभ हस्ते बारणे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. - Divya Marathi
आयआयटी मद्रास (चेन्नई) येथे झालेल्या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉ. ए. आर. लक्ष्मणन यांच्या शुभ हस्ते बारणे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
पुणे- 16 व्या लोकसभेमध्ये सर्वाधिक व उत्कृष्ट प्रश्न मांडल्याबद्दल मावळमधील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना आयआयटी मद्रासच्या पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने शनिवारी संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. आयआयटी मद्रास (चेन्नई) येथे झालेल्या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉ. ए. आर. लक्ष्मणन यांच्या शुभ हस्ते बारणे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनिवासन, तसेच आयआयटीचे प्रमुख भास्कर राममूर्ती उपस्थित होते.
चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फौंडेशनच्या वतीने संसदेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकसभा सदस्यांना हा पुरस्कार दिला जातो. 16 व्या लोकसभेच्या गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेवून सर्वाधिक 314 प्रश्न लोकसभेमध्ये विचारल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांना पहिल्याच वर्षात हा पुरस्कार मिळाला. त्याच बरोबर लोकसभेच्या कामकाजात सर्वाधिक चर्चेत सहभाग घेतल्याबद्दल भाजपचे राजस्थानमधील पालीचे खासदार पी. पी. चौधरी यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
15 व्या लोकसभेच्या कामकाजाचा आलेख पाहता उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 15 व्या लोकसभेचे शिवसेनेचे 5 व्यांदा खासदार असलेले आनंदराव अडसूळ, भाजपचे चंद्रपूरचे चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, त्याचबरोबर दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे बिकानेर (राजस्थान)चे खासदार व लोकसभेतील भाजपचे प्रतोद अर्जुन मेघवाल यांना संसद महारत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.