आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Will File Petation Regarding Adarsh Scam In High Court

आदर्श घोटाळाप्रकरणी शिवसेना उच्च न्यायालयात दाखल करणार जनहित याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आदर्श घोटाळाप्रकरणी माजी न्यायाधीश जे.ए.पाटील यांनी तयार केलेला अहवाल राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात फेटाळून लावला आहे. याविरोधात शिवसेनेतर्फे उच्च न्यायालयात जानेवारी महिन्यात याचिका दाखल करुन दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्या नीलम गो-हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
गो-हे म्हणाल्या, या अहवालात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह राष्‍ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सुनील तटकरे व राजेश टोपे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. शासनाने हा अहवाल फेटाळून जनतेचा अपमान केला आहे. आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळ्यात अशाच प्रकारे जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना राज्यभर आंदोलन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.आहे. आदर्शमध्ये 12 प्रशासकीय अधिकारी व बेनामी फ्लॅट घेतलेल्या 22 जणांविरोधातही जनहित याचिका दाखल करण्यात येईल.