आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena's All 18 Mp & Uddhav Thackeray At Ekvira Devi, Karla lonavala

उद्धव ठाकरे सर्व 18 खासदारांसह कार्ल्यात एकवीरा गडावर, सपत्नीक घेतले दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोकसभा निवडणुकीत छप्पर फाडके विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कार्ला येथील एकवीरा गडावर देवीच्या दर्शनाला आले आहेत. त्यांच्यासमवेत पत्नी रश्मीसह चिरंजीव आदित्य यांनीही एकविरा देवीचे दर्शन घेतले.
लोकसभा निवडणुकीत उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रचंड यश मिळविले. लढवलेल्या 21 पैकी 18 जागांवर शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या सर्व खासदारांसह उद्धवजी ठाकरे शुक्रवारी सकाळी 12 च्या सुमारास एकवीरा मातेचे दर्शन घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. झंझावाती प्रचारदौरे केले. त्यावेळी या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे खासदार निवडून दे, असे साकडे एकवीरा मातेकडे घालण्यात आले होते. अखेर एकवीरा मातेच्या आशीर्वादाने शिवसेनेचे लोकसभेत तब्बल 18 खासदार पोहचले आहेत. त्यामुळेच उद्धव यांनी आपल्या सर्व खासदारांसह दर्शन घेतले.
उद्धव विनायक राऊतांसह परवा भराडीदेवीचे दर्शन घेणार- रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा खासदार निवडून दे. या खासदाराला घेऊन दर्शनाला येईन, अशी प्रार्थना उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील एका जाहीर सभेत केली होती. ही प्रार्थनाच जणू मातेने ऐकली आणि शिवसेनेचे विनायक राऊत दीड लाखांच्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या जबरदस्त यशानंतर उद्धव ठाकरे कृतज्ञ भावनेने भराडीमातेच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गात जाणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता ते आंगणेवाडीच्या भराडीमातेच्या मंदिरात जाणार आहेत. देवीची खणा-नारळाने ओटी भरतील आणि आशीर्वाद घेतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून सांगण्यात आले.