आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगन नारंगच्या ‘गन फॉर ग्लोरी’ला नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लंडन ऑलिम्पीकमध्ये नेमबाजीत पदक जिंकून देशाची मान उंचावणा-या गगन नारंगला सरकारी अनास्थेचा फटका बसला आहे. पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडापीठात (बालेवाडी) नारंगने चालवलेले शुटींग प्रशिक्षण 31 येत्या मार्चपासून थांबवण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. शुटींग अकादमीबरोबरच आणखी तीन क्रीडा प्रशिक्षणांवरही संक्रात आली. यामुळे सुमारे चारशे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

शिवछत्रपती क्रीडापीठाचे उपसंचालक जनक टेकाळे यांच्या स्वाक्षरीने आलेल्या नोटीसा पाहून खेळाडूंना धक्काच बसला. टेकाळे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘बालेवाडीमध्ये शुटींग, लॉन टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या चार खेळांच्या प्रशिक्षण अकादमी चालतात. येत्या 31 मार्चला त्यांच्याबरोबरचा करार संपणार आहे. तत्पुर्वी भाडे व कराराची मुदतवाढ नव्याने निश्चित करण्यासंबंधीच्या नोटिसा क्रीडा आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे पाठविण्यात आल्या आहेत.’’

राज्य सरकारने या प्रशिक्षण शिबिरांमधून तयार होणा-या दर्जेदार खेळाडूंची संख्या लक्षात घेऊन पुढची पाच वर्षे भाडेवाढ न करण्याचे आश्वासन यापुर्वी दिले असल्याचे क्रीडा खात्यातील अनेक वरीष्ठ अधिका-या ंनी मान्य केले. परंतु, नव्याने आलेले राज्याचे क्रीडा आयुक्त पंकज कुमार यांच्या आदेशामुळे नोटिसा पाठवण्याची कारवाई करावील लागल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. सध्या ८0 खेळाडू प्रशिक्षण घेत असून यातले साठ महाराष्ट्रातलेच आहेत. राही सरनौबत, तेजस्विनी मुळे, सौरभ दळवी आदी खेळाडूंचा समावेश आहे. बॅडमिंटन, लॉन टेनिस व टेबल टेनिस अकादमीतही प्रत्येकी शंभर मुले प्रशिक्षण घेत आहेत. सरकारी नोटिशीमुळे यांच्या सरावावर संकट आले आहे.
हा तर विश्वासघात
‘वर्षाला आम्ही 5 लाख 39 हजार रुपये भाडे देतो. गगन नारंगने ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर पुढचे पाच वर्षे कोणतीही भाडेवाढ न करण्याचा शब्द आम्हाला सरकारने स्वत:हून दिला. त्यानंतर अचानक आलेली नोटीस पाहून आम्हाला धक्काच बसला. सरकारने केलेल्या विश्वासघातामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सरावात खंड पडण्याची भीती आहे.’’
पवनसिंग राष्ट्रीय प्रशिक्षक, गगन नारंग शुटींग अ‍ॅकेडमी.