आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrad Pawar Answered Pm Modi\'s Blame On Pawar At Baramati

संरक्षणमंत्री झाल्यावर दुस-याच दिवशी सीमेवर गेलो होतो- पवारांचे मोदींना प्रत्त्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामती जाऊन केलेल्या आरोपांनी व्यथित झालेल्या शरद पवारांनी मोदींना चोख उत्तर दिले आहे. मी संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुस-याच दिवशीच सीमाभागात जवानांशी संवाद साधला होता. तसेच मंत्री झाल्यावर दुस-याच दिवशी जवानांशी संवाद साधून त्यांचे मनोधौर्य वाढविणारा मी पहिलाच संरक्षणमंत्री होतो असे स्पष्ट केले आहे. त्याचा पुरावा म्हणून पवारांनी 1991 सालचा फोटोच आपल्या टि्वटर व फेसबुकवर अपलोड केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या बालेकिल्ला बारामतीत जाऊन शरद पवारांसह अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवार जातीपातीच्या राजकारणात अडकले असल्याची टीका करताना अनेक मुद्यांना हात घातला होता. सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून हातात ठेवलेले राजकारण असो की धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणे असो यासह मुद्यांवर मोदींनी पवारांसह सडकून टीका केली होती. मोदींनी पवारांवर प्रथमच इतकी जहरी टीका केली आहे. त्यामुळे पवार व्यथित आहेत. पवारांनी याबाबत टि्वटरवर खुलासा करताना मोदींच्या आरोपांचे खंडन करताना आपले म्हणणे मांडले आहे.
पुढे वाचा पवारांनी मोदींवर काय टीका केली होती, मोदींना त्यास कसे उत्तर दिले तर पवारांनी त्यास कसे प्रत्त्युत्तर दिले.... वाचा दोघांतील शाब्दिक जुगलबंदी...
पवारांचा आरोप- मोदींना देशाच्या सुरक्षेपेक्षा निवडणूका महत्त्वाच्या वाटतात- देशाच्या सुरक्षेबद्दल नरेंद्र मोदी गंभीर नाहीत. आजवरच्या इतिहासात पंतप्रधानांनी एका राज्याच्या निवडणुकीत जितक्या सभा घेतल्या नाहीत, तितक्या सभा मोदी घेत आहेत. तिकडे सीमेवर पाकिस्तान आपल्या निष्पाप लोकांचे जीव घेत आहे, आपले जवान शहीद होत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. देशाला स्वतंत्र व पूर्णवेळ देणारा संरक्षणमंत्री नाही. संरक्षण खात्याचा कारभार ठप्प झाला आहे आणि आपले पंतप्रधान भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून बसले आहेत.
मोदींचे उत्तर- शरदराव, सीमेवरील गोळीबाराचे राजकारण करून भारतीय जवानांना नाउमेद करू नका. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यांना आपल्या जवानांच्या बदुंकींतून उत्तर दिले जात आहे. मात्र या हल्ल्यांचा राजकीय लाभासाठी वापर करणे चुकीचे आहे. पवारजी, तुम्ही याबाबत माझ्यावर सातत्याने टीका करतात मग तुम्ही संरक्षणमंत्री असताना अशा हल्ल्यांच्या वेळी सीमेवर कधी गेला होता का? असा सवाल उपस्थित करीत पवारांवर हल्लाबोल केला.
पवारांचे मोदींना प्रत्त्युत्तर- मी देशाचा संरक्षणमंत्री असताना चीनसह अन्य कोणत्याही सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. कारण राष्ट्रीय सुरक्षेकडे आम्ही कधीही दुर्लक्ष केले नव्हते. देशाच्या सुरक्षाविषयक बाबींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून सीमेवर चकमकी सुरू असताना ते केवळ राजकारण करण्यातच गुंतलेले आहेत. एखाद-दोन आमदार निवडून आणणे यावर त्यांचा भर आहे. राष्ट्रीय हिताकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. हे प्रत्तुत्तर देतानाच, संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुस-याच दिवशी आपण कश्मीरमधील जवानांशी संवाद साधल्याची आठवण पवारांनी करून दिली आहे. त्याबाबतच फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
पुढे आणखी वाचा, पवार-मोदी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या...