आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी: भक्तीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी, पाहा क्षणचित्रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. - Divya Marathi
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले.
पुणे- मुखी हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात आलेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगद्गुरु संत तुकाराम महाराजाच्या पालखी सोहळ्याचे स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे, आणि आयुक्त राजीव जाधव यांनी भक्ती-शक्ती चौक निगडी येथे दिंडी प्रमुखांना सतरंजी, हार व श्रीफळ भेट देऊन स्वागत केले. हा भक्तीचा अनोखा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी निगडी चौकात पिंपरी-चिंचवडवासीयांची अलोट गर्दी लोटली होती. शहर शिवसेनेच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच वारक-यांना गुडदानी व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखीचे शहरात आगमन झाले. लाखो वारक-यांचा सहभाग असलेल्या दिंडी प्रमुखांना महानगरपालिकेच्यावतीने सन्मानीत करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, विरोधी पक्षनेते विनोद नढे, आयुक्त राजीव जाधव, ब प्रभाग अध्यक्ष ॲड. संदिप चिंचवडे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळा प्रमुख रामदास मोरे, अशोक मोरे, अभिजीत मोरे, सुनिल मोरे, जालिंदर मोरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने विविध सुविधा पुरविल्या आहेत. वारक-यांना पालिकेच्या तसेच खाजगी शाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, वैद्यकिय सेवा, फिरते शौचालय आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्या बरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर, अँम्ब्युलन्स व अग्निशामक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहिली अभंग आरती मुस्लिम फकीर अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात-
दरम्यान, पहिला मुक्काम आटोपून तुकोबाची पालखी देहूतील इनामदारवाड्यातून चिंचोली, देहू रोड परिसरातून आकुर्डीत दाखल झाली. पालखीने दुपारचा विसावा चिंचोलीत घेतला होता. ढगाळ वातावरणामुळे हवेत एक अल्हाददायक वाटत होते. देहूकर इनामदारवाडा ते श्री अनगडशाह बाबा दर्ग्यापर्यंत देहूकर ग्रामस्थांनी पालखी खांद्यांवर आणली. सोहळ्यातील प्रथम अभंग आरती मुस्लीम फकीर आणि तुकोबांचे शिष्य अनगडशाह बाबा यांच्या दर्ग्यासमोर झाली व नंतर पालखी रथ पुढील प्रवासाकडे मार्गस्थ झाला.
पुढे पाहा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दुस-या दिवसाची क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...