आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीतून पुण्याकडे प्रयाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी आपला आकुर्डीतील दुसरा मुक्काम उरकून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर (जुन्या) भाविकांनी एकच गर्दी केली होती. आकुर्डीतील खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन, पिंपरीतील आंबेडकर चौकातून पालखी खडकीकडे मार्गस्थ झाली. दुपारी बाराच्या सुमारास ती पुणे हद्दीत प्रवेश करेल.
आज सकाळी उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी वारक-यांची मनोभावे सेवा केली. आज शनिवार असल्याने उपासाची खिचडीसह जेवण देण्यात आले. विविध संस्था, संघटना यांनीही वारक-यांची चांगली सोय केली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनेही वारक-यांसाठी आरोग्य सेवा, जेवणावळीचे आयोजन केले होते. पिंपरीतील एच ए कॉलनी येथे वारक-यांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होती. दुपारी पुणे शहरात दिवसभर पालखी फिरल्यानंतर कसबा पेठेत मुक्कामी स्थानी जाईल. पुण्यात पालखीचे दोन मुक्काम आहेत. येथेच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीचे मनोमीलन होईल व सोमवारी सकाळी दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूराकडे मार्गस्थ होतील.
देहूनगरीतून काल सकाळी तुकाराम महाराजांची मार्गस्थ झाल्यानंतर कालच्या रात्रीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात होता. शुक्रवारी दिवसभर आकुर्डीकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. काल रात्री टाळ -मृदुंगाच्या गजरात किर्तन, अभंग, भारूडाचे कार्यक्रम ठिकठिकाणी सुरु होते.
पुढे पाहा, संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील उद्योगनगरीत टिपलेली क्षणचित्रे...