आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगारी \'जनक\' तर टिळक \'प्रसारक\'; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा फलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लावलेला फलक. - Divya Marathi
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लावलेला फलक.

पुणे- गणेशोत्सवाचे आद्य जनक कोण? लोकमान्य टिळक की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी? या विषयावर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने फलक लावला आहे. त्यामुळे या विषयावरील चर्चा अजुनही थांबलेली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 
काय म्हटले आहे फलकावर
मंडळाने गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात केलेल्या रथावर हा फलक लावला आहे. या फलकावर भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांची छायाचित्र लावण्यात आली असून छायाचित्रांच्या वरच्या बाजूला भाऊसाहेब रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक तर लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रसारक म्हटले आहे. त्यामुळे या फलकाने पुण्यात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी गणेशोत्सवाचे जनक कोण? असा वाद पुण्यात रंगला होता. पुणे महापालिका आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात या मुद्द्यावरून वादही झाला आहे.
 
विशेष बोधचिन्हावरून काढावे लागले टिळकांचे चित्र 
यंदा गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हावरून टिळकांचे चित्र काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मंडळाने आज विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी फलक लावला आहे. पुणेकरांमध्ये हा फलक चर्चेचा विषय ठरला आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...