आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबनीस ऊवाच: ...तर आपल्याला मोदींना श्रद्धांजली अर्पण करावी लागली असती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकुर्डीतील परिसंवादादरम्यान बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस - Divya Marathi
आकुर्डीतील परिसंवादादरम्यान बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात पाकिस्तानला दिलेल्या भेटीवरून नियोजित 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काबूलवरून अचानक पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचा पुळका आला म्हणून गेले नव्हते तर राष्ट्राच्या हितासाठी गेले होते. मात्र, त्यांच्या जीवाला पाकिस्तानात धोका आहे. तेथे दहशतवाद्यांचे तळं आहेत, हाफीज सईदसारखा कट्टरपंथीय आहेत, दाऊद आहे. लाहोर दौ-यादरम्यान त्यांना कोणाचीही गोळी लागू शकली असती. तसे झाले असते तर मोदी तेथेच संपले असते व आपल्याला पाडगावकरांच्या आधी मोदींना श्रद्धांजली अर्पण करावी लागली असती असे धक्कादायक वक्तव्य सबनीस केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीमधील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात आयोजित केलेल्या एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी सबनीस हे बदलत्या जगात संवाद, समन्वय किती गरजेचा आहे याचा ते विद्यार्थ्यासमोर आढावा घेत होते. दहशतवाद, कट्टरता यावर भाष्य करताना मोदींनी घेतलेल्या निर्णयाचे कौतूक ते करीत होते. मात्र, मोदींचे कौतूक करता-करता त्यांची जीभ घसरली आणि सबनीस काहीही बरळत बसले.
सबनीस म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असतानाही नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून उत्तम काम करीत आहेत. आशिया देशाशी ते संबंध वाढवत आहेत. 34 इस्लामी देशांशी संवाद साधत आहेत. अमेरिका-चीन यांच्याशीही ते मैत्री करीत आहेत. आताही ते आपला शत्रू पाकिस्तानात अचानक केले. मोदी तेथे नवाझ शरीफ यांचा पुळका आला म्हणून तेथे गेले नाहीत तर राष्ट्रहितासाठी तेथे गेले. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींची कारकिर्द कलंकित आहे. मात्र, पंतप्रधानपदी बसल्यानंतर ते गांधीजींचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. गांधींजी काँग्रेसच्या जवळचे व विचाराचे होते. मोदी आता गांधी, बुद्ध यांचे तत्त्वज्ञान सांगत जगातील दहशतलाद कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. संपूर्ण जागाला संवादाची गरज आहे. संवादातूनच प्रश्न सुटू शकतात. संघाचे स्वयंसेवक राहिल्यानंतरही मोदी आपले विचार, पक्ष बाजूला ठेऊन संवादातून प्रश्न सोडवू पाहत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतूक केले पाहिजे. संघर्ष कमी करून संवादानेच प्रश्न सोडवायला हवेत. म्हणूनच मोदी पाकिस्तानात गेले. त्यांच्या जीवाला मोठा धोका असूनही त्यांनी ते पाऊल उचलले. दहशतवादाचे आगार असलेल्या पाकिस्तानात मोदींच्या जीवाला धोका होता. ते कोणाच्याही गोळीला बळे पडले असते. तसे काही घडले असते तर आपल्याला कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याऐवजी मोदींना श्रद्धांजली वाहावी लागली असते असे खळबळजनक वक्तव्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले.
पुढे आणखी पाहा व वाचा...
बातम्या आणखी आहेत...