आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाचे सेन्सॉर बोर्ड कुणी केले, साहित्य संमेलनाध्यक्षांनी डागली तोफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मी साहित्य संमेलनाचा लोकनियुक्त अध्यक्ष आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलो आहे. माझे अध्यक्षीय भाषण न छापणे, हा राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान आहे. माझे भाषण छापण्यासंदर्भात साहित्य महामंडळाला ‘सेन्सॉर बोर्ड’चे अधिकार कुणी दिले, असा सवाल करत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळावर तोफ डागली.
साहित्य महामंडळाचे पदाधिकारी स्वयंघोषित सेन्सॉरशिप लादत आहेत, ही गद्दारी आहे. संमेलनाध्यक्षाचे भाषण छापणे हे महामंडळाचे काम आहे. भाषणातील काही मुद्दे वा वाक्ये याविषयी शंका वाटली तर ते माझ्याशी चर्चा करू शकत होते. पण तसे काहीच न करता, भाषण न छापण्याची ठेकेदारी केली आहे. महामंडळ म्हणजे काय सेन्सॉर बोर्ड आहे का?, असा सवाल सबनीसांनी केला. यानिमित्ताने आलेल्या भल्याबुऱ्या अनुभवांवर लवकरच स्वतंत्र लेखन करणार आहे. हे अनुभव मला शिकवणारे ठरले, असे सबनीस म्हणाले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले
अध्यक्षीय भाषण न छापून महामंडळाने राज्यघटना व लोकशाहीशी गद्दारी केली. लोकनियुक्त अध्यक्षाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडवले. पण रसिकांच्या प्रेमावर जगणाऱ्या या अध्यक्षाने उद्घाटनाच्या दिवशीच अवघ्या सात तासांत भाषण छापून रसिकांपर्यंत पोचवले.
- श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष