आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटलांनी टोचले कान, सबनीस यांची दिलगिरी, मोदींवरील वक्तव्याबाबत स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी बनलेले मराठी साहित्य संमेलनाचे नियाेजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अापल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.‘मोदींबाबत माझ्या तोंडून गेलेले एकेरी शब्द मी मागे घेतो’ असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी. पाटील यांनी कान टाेचल्यानंतर सबनीस यांनी ही भूमिका घेतल्याचे मानले जाते.

सबनीस म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदींचा अवमान केला नव्हता. मी त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत गौरवच करीत होतो. मात्र माझ्या तोंडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द काढून टाकतो. मी जे काही बोललो ते भावनेपोटी बोललाे व ते माझे मत आहे, त्यावर मी ठामही आहे. पण माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या आहेत तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’

‘आयुष्यात एकदाच संमेलनाध्यक्ष होता येते हे लक्षात ठेवले पाहिजे’, असे सांगत सबनीस यांनीच पुढाकार घेऊन वाद मिटवावा अशी शब्दांत पाटील यांनी कान टोचले होते. तत्पूर्वी, घुमान संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्याकडून डॉ. पी. डी पाटील यांनी
सूत्रे स्वीकारली.
बातम्या आणखी आहेत...