आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shripal Sabnis Speech Not Published By Mahamandal

महामंडळाचा करंटेपणा: श्रीपाल सबनीसांचे लिखित भाषण छापण्यास टाळाटाळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड, पुणे: 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे 127 पानांचे लिखित भाषण महामंडळाने अद्याप छापले नाही. सबनीस यांच्या लिखित भाषणांच्या प्रती माध्यमे, रसिकांपर्यंत न पोहचवल्याने महामंडळाने आपला करंटेपणा सिद्ध केला आहे अशी टीका होत आहे. या प्रकरणानंतर सबनीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आपले लिखित भाषण लोकांपर्यत पोहचू नये म्हणून महामंडळातील काही व्यक्ती प्रयत्न करीत आहेत अशा शब्दांत सबनीस यांनी आपल्या बिनधास्त शैलीत महामंडळावर शरसंधान साधले आहे.
पिंपरी-चिंचवड संमेलनाचा आज समारोप होत आहे. गेली तीन-चार दिवस पिंपरीत सारस्वंताचा मेळा भरला आहे. शनिवारी संमेलानध्यक्ष सबनीस यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. मात्र, वेळेअभावी त्यांना भाषण उरकते घ्यावे लागले. मात्र आपली सविस्तर भूमिका माझ्या लिखीत भाषणात वाचा असे आवाहन सबनीस यांनी केले होते. मात्र, अध्यक्षांचे लिखित भाषण लोकांपर्यंत, माध्यमांपर्यंत पोहचवण्याचे काम साहित्य महामंडळाचे असते. मात्र, महामंडळाने सबनीस यांच्या भाषणाची प्रत अद्याप उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे संमेलननगरीत चर्चा सुरु झाली आहे.
सर्वसाधारणपणे संमेलनाध्यक्षांचे भाषण उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच तयार असते. तसेच संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाआधीच या भाषणाची प्रत माध्यमांना व साहित्यिकांसह रसिकांना दिली जाते. मात्र, यंदा प्रथम असे घडताना दिसले आहे. यामागे सबनीस यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वास असल्याचे कळते. याशिवाय सबनीस यांनी आपल्या लिखीत भाषणात काही वादग्रस्त मुद्दे मांडल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमांपर्यंत त्यांच्या लिखीत भाषणाची पीडीए फाईल पोहचल्या आहेत. त्यात त्यांनी भांडवलशाहीत सर्वसामान्य, गरीब, मजूर, आदिवासींवर कसा अन्याय होतोय यावर भाष्य केले आहे. याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या सहिष्णू, असहिष्णू व उजव्या विचारसरणीबाबत काही भाष्य केले आहे. मोदींविरोधात वक्तव्य केल्याने वाद झाल्याने सबनीस यांच्या लिखित भाषणाची प्रत पाठवून आणखी काही वाद उदभवू नये म्हणून महामंडळाने हा वेळकाढूपणा केल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
सबनीसांचे काय आहे म्हणणे?
- महामंडळाचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांना मी 15 तारखेला सकाळी सीडी तसेच ई मेलच्या माध्यमातून माझे लिखीत भाषण पोहचवले.
- 15 तारखेला सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत हे भाषण छापून तयार ठेवणे अपेक्षित होते.
- 16 जानेवारी अर्थात उद्घाटनाच्या दिवसांपर्यंत मला महामंडळाकडून काहीच हालचाल झाली नसल्याचे आढळले. यातून महामंडळ राजकारण करीत असल्याचे लक्षात आले.
- भाषण रसिकांपर्यंत पोहचू नये, यासाठी महामंडळातील काही व्यक्ती प्रयत्न करीत आहेत.
- अखेर सबनीस यांनीच आपल्या भाषणाच्या प्रती छापून शनिवारपर्यंत तीन हजार लोकांना प्रती वाटल्या.
- या घटनेमुळे माझ्या मनात महामंडळाच्या सांस्कृतिकता व विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍न निर्माण झाले आहेत, हा अनुभव धक्कादायक आहे. संमेलनाच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे, असे सबनीस म्हणाले.
- महामंडळाने या प्रकरणी तोंडावर बोट ठेवले आहे.