आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shripal Sabnis Warning Sahitya Mahamandal For His Publishing Speech

माझे भाषण 4 दिवसात रसिकांपर्यंत पोहचवा, अन्यथा 27 पासून उपोषण- सबनीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने माझे लिखित भाषण छापून 26 जानेवारीपर्यंत रसिक, नागरिकांपर्यंत पोहचवावे अन्यथा 27 जानेवारीपासून लाक्षणिक उपोषणाला सपत्निक बसू अशा इशारा संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महामंडळाला दिला आहे. दरम्यान, सबनीस यांच्या या भूमिकेमुळे साहित्य महामंडळासमोर नवी डोकेदुखी सुरु झाली आहे. साहित्य महामंडळाने चूक केली असली तरी अजून वेळ गेली नाही असे सांगत सबनीस यांनी आपले भाषण लोकांपर्यंत पोहचवावे अशी अपेक्षा सबनीस यांनी गुरुवारी व्यक्त केली होती. महामंडळाने एक पाऊल मागे येत भाषण छापण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे असहिष्णू व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापणे, त्यात काही मुद्दे आक्षेपार्ह आहेत असे सांगणे हा त्याचाच भाग आहे. पण महामंडळाला अशा 'सेन्सॉरशिप'चा अधिकार नेमका दिला कोणी अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी महामंडळावर टीका करीत आपले मौन सोडले होते.
पुस्तक लिहून बुरखा फाडणार- सबनीस
साहित्य संमेलन, त्याआधी संमेलनाध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक व यादरम्यान आलेल्या अनुभवावर आपण लवकरच पुस्तक रूपाने भाष्य करणार आहेत. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून संमेलनाच्या समारोपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली. वेगवेगळे वाद तयार केले गेले. राजकीय व्यक्तींसोबत साहित्य क्षेत्रातील मंडळींनीही राजकारण कसे केले हे सगळे अनुभव शब्दबद्ध करणार आहे. "मॉर्निंग वॉक‘ला चला, अशा शब्दांत मला आलेली धमकी, गाढवावरून निघालेली धिंड...अशा अनेक घटनांमागील राजकारणाचा वेध मी घेणार आहे. 'अध्यक्षाची आत्मकथा' असे शीर्षक असलेल्या पुस्तकाद्वारे संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या पडद्यामागील सर्व घडामोडींवर रसिक व वाचकांसमोर आणणार आहे, असे सबनीस यांनी म्हटले आहे.
डॉ. पी. डी. पाटील खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले- सबनीस
महामंडळाच्या दोन पदाधिका-यांनी विठ्ठल वाघ यांना, तर एकाने अरुण जाखडे यांना जाहीर पाठिंबा दिला. पदाधिकाऱ्यांनी असा पाठिंबा देणे योग्य आहे का?. मी महामंडळाला नको होतो पण लोकशाही मार्गाने निवडून आल्याने त्यांची गोची झाली. अशा वेगवेगळ्या घटना घडल्या असल्या तरी स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. पी. डी. पाटील माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याचे मी पुस्तकात नमूद करणार आहे. अध्यक्षांची आत्मकथा हे पुस्तक लिहून मी अनेकांचा बुरखा फाडणार आहे असेही सबनीस यांनी सांगितले.
पुढे वाचा, सबनीसांनी महामंडळावर कोणत्या शब्दांत केली होती टीका...