आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहजाद पुनावालांचे BJP नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल; भाजपशी निकटचे संबंध असल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असल्याने पक्षावर घराणेशाही लादत असल्याचा आरोप केला होता. - Divya Marathi
शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असल्याने पक्षावर घराणेशाही लादत असल्याचा आरोप केला होता.

पुणे- शहजाद पुनावाला यांचे भाजपच्या नेत्यांशी निकटचे संबंध आहेत, आणि त्यामुळेच ते राहुल गांधींवर  टीका करत आहेत, असा आरोप काँगेसने केल्यानंतर शहजाद पुनावाला यांचे भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटो आता व्हायरल होत आहेत.

 

राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला यांना तीव्र विरोध दर्शवला होता. पुनावाला यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. अापल्याला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात वरिष्ठ नेत्यांनी अडवल्याचा आरोपही पुनावाला यांनी केला होता. तसेच घराणेशाही वाचवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड सुरु असल्याचे पुनावाला म्हणाले होते.

 

त्यानंतर आता शहजाद पूनावाला यांचे काही फोटो व्हायरल होत असून, या फोटोंमध्ये ते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, खासदार अमर साबळे, पुण्याच्या कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यासोबत दिसत आहेत.

 

पुढील स्लाईडवर BJP नेत्यांसोबतचे फोटो

बातम्या आणखी आहेत...