आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगंधर्व ही व्यक्ती नसून ते सुरेल तत्त्व; ज्येष्ठ गायिका बकुल पंडित यांची भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘ईशतत्त्व, गुरुतत्त्व ज्या अर्थाने आपण मानतो, त्याच अर्थाने नटसम्राट बालगंधर्व  हे मधुर, सुरेल आवाजाचे तत्त्व आहे. नव्या पिढीने या सुरेल गायकीची नक्कल न करता, त्या गायकीचा मागोवा घेत संगीत रंगभूमीप्रति असलेली आपली जबाबदारी ओळखली पाहिजे,’ अशी भावना ज्येष्ठ गायिका बकुल पंडित यांनी रविवारी व्यक्त केली.  
   
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा ‘बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार’ बकुल पंडित यांना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते येथे प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बाेलत हाेत्या. १५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी देवगंधर्व भास्करबुवा बखले  पुरस्कार प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांना देण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, भोजराज तेली, अनुराधा राजहंस आदी या वेळी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...