आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Pandit Ramesh Narayan Contiune Sing The Song

प्रसिद्ध गायक पं. रमेश नारायण सलग 36 तास करणार गायन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त प्रसिद्ध गायक पं. रमेश नारायण एका अनोख्या विक्रमासाठी सज्ज झाले असून, सलग 36 तास शास्त्रीय संगीत गायन करून आपलाच विक्रम मोडण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. यापूर्वी 1994 मध्ये सलग 30 तास गायनाचा विक्रमही त्यांनी केला होता. पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथील शांताराम पाँड येथे 19 आणि 20 जानेवारीला ही ऐतिहासिक मैफल सादर करण्यात येणार आहे.
‘दिव्य मराठी’शी बोलताना पं. रमेश नारायण म्हणाले, जागतिक आणि भारतीय स्तरावरील सर्व महान कलागुरूंना आदरांजली म्हणून मी ही विक्रमी मैफल सादर करण्याचा संकल्प केला आहे. माझे गुरुजी संगीतमार्तंड पं. जसराज मला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. तसेच डॉ. वाय. वेंकटेश राव, उस्ताद दिलशाद खाँ, पं. आनंद बदामीकर, हरीहरन, शंकर महादेवन, पं. रवींद्र चारी, पं. अरविंदकुमार आझाद, पं. आदित्य बॅनर्जी आदी उपस्थित राहणार आहेत. ही मैफल 19 जानेवारीला पहाटे पाच वाजता पं. जसराज यांची पाद्यपूजा करून सुरू होईल आणि 20 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता संपेल.