आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहगडावर जाणारा रस्ता वाहतुकीला बंद; दरडी पडत असल्याने सुरक्षितता म्हणून उपाययोजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूट्टीच्या दिवशी सिंहगडावर सुमारे 10 हजार पर्यटक येत असतात. - Divya Marathi
सूट्टीच्या दिवशी सिंहगडावर सुमारे 10 हजार पर्यटक येत असतात.
पुणे- सिंहगडावर जाणारा रस्ता दरडी पडत असल्याने अजून देखील वाहतुकीला बंद असणार आहे, अशी माहिती वन विभागाने दिली आहे. दरडी पडत असल्याने सुरक्षितता म्हणून हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. घाटरस्ता 9 किलोमीटरचा आहे. त्यामध्ये यंदा 15 दिवसात 2 वेळा दरडी कोसळल्या आहेत.
 
सूट्टीच्या दिवशी सुमारे 10 हजार पर्यटक येत असतात. या आठवड्यात अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे हजारो पर्यटक गडावर येण्याची शक्यता आहे. परंतु दरडी पडत असल्याने सुरक्षितता म्हणून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. घाट रस्ता वाहतुकीला धोकादायक आहे. म्हणून जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घाटरस्ता वाहतुकीला बंद केला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...