आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरफोडी करणा-याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- घरफोडी करणा-या आरोपीचे मुसक्‍या आवळण्‍यात सिंहगड रोड पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी आरोपी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (27) याला 23 नोव्‍हेंबर, 2017 रोजी गुरुवारी अटक करण्‍यात आली. आरोपी मूळचा अहमदनगर जिल्‍ह्यातील जामखेड तालुक्‍यातील पखराबाज धानोरे या गावाचा रहिवासी आहे. सिंहगड रोड पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत गेल्‍या काही दिवसांपासून घरफोड्यांच्‍या घटनांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 7 दिवस तपास करुन ही कारवाई केली आहे. यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्‍ही फुटेजचाही अभ्‍यास केला होता.


चौकशीदरम्‍यान आरोपीने सिंहगड पोलिस स्‍टेशनच्‍या हद्दीत एकुण 12 घरफोड्या केल्‍याचे कबुल केले आहे. त्‍याच्‍या ताब्‍यातून 789 ग्रॅम वजनाचे सोन्‍याचे दागिणे व रोख रुपये 25,000 रुपये असा एकुण 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला आहे. यापूर्वीही आरेापीवर घरफोडीचे 10 गुन्‍हे कोथरुड, निगडी, चिंचवड, येरवडा, विश्रांतवाडी, निगडी या भागात दाखल आहेत.

 
अप्‍पर पोलिस आयुक्‍त डॉ. प्रविण मुंढे, पोलिस उपआयुक्‍त शिवाजी पवार, पोलिस आयुक्‍त विष्‍णु जगताप, पोलिस निरीक्षक बबन खोडदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, पोलिस कर्मचारी यशवंत ओंबासे, दयानंद तेलंगे पाटील, दत्‍ता सेानवणे, संतोष सावंत, सचिन माळवे, राहुल शेडगे, वामन जाधव, शिवा कायगुडे, पुरषोत्‍तम गुन्‍ला व मयुर शिंदे यांच्‍या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...