आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अल्पवयीन मेहुणीवर भाऊजीचा बलात्कार, चौकशीनंतर उघडकीस आले प्रकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अल्पवयीन मेहुणीवर भाऊजीने बलात्कार केल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात उघडकीस आली आहे. दरम्यान, पीडित मुलगी घर साेडून पुणे रेल्वेस्थानकावर अाली होती. या वेळी पोलिसांनी तिची चाैकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पाेलिसांनी राजन्ना गंगाराम भुल्ले व लक्ष्मीबाई राजन्ना भुल्ले या दांपत्यास अटक केली अाहे. पीडित मुलगी ही लक्ष्मीबाईची बहीण असून तिला तिने आपल्या घरी शिक्षणासाठी ठेवले होते. त्यानंतर राजन्नाने मुलीला एका बांधकाम साइटवर कामाला ठेवले होते. गेल्या अनेक दिवसांपासून राजन्नाची मेहुणीवर वाईट नजर होती. काही महिन्यांपूर्वी त्याने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केले होते. त्यानंतर सातत्याने तिच्यासोबत संबंध ठेवत होता. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून मुलीने घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ती मंगळवारी रात्री रेल्वेस्थानकावर आली होती. या वेळी पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिच्यासोबत झालेला प्रकार उघडकीस आला.

या त्रासाला कंटाळून पिडित मुलगी घर साेडून पुणे रेल्वे स्थानकावर अाली. त्यावेळी पुणे लाेहमार्ग पाेलीस दलातील एका महिला कर्मचा-यास ही मुलगी मिळुन अाली. तिच्याकडे तीच्या पत्त्याबाबत शाेध घेत असताना, सदरचा प्रकार उघडकीस अाला. हडपसर पाेलीसांनी अाराेपीं विराेधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला अाहे. हडपसर पाेलीस ठाण्याच्या महिला पाेलीस उपनिरीक्षक एस.पवार याबाबत पुढील तपास करत अाहे.