आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीतारामबाबांवर खर्ड्यातच अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जामखेडजवळील खर्डा येथील सीतारामबाबा साधू शिंदे ऊर्फ उंडेगावकर (८८) यांचे तीन दिवसांपूर्वी पुण्यात निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा यावरून भक्तांमध्ये वाद िनर्माण झाला हाेता. हा वाद न्यायालयात पोहोचला. मात्र पुण्याचे सत्र न्यायाधीश एस.आर. निमसे यांच्या न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने उंडेगाव (ता. भूम) भक्तांची याचिका फेटाळली गेली. अखेर कोरेगाव पार्क पोलिसांनी बाबांचे पार्थिव खर्ड्यातील भक्तांच्या स्वाधीन केले. त्यामुळे अखेर तीन दिवसांनंतर खर्ड्यात अंत्यसंस्कार होणार असल्याचे स्पष्ट झाले.
सीतारामबाबा हे अनेक वर्षापासून खर्डा येथे वास्तव्यास होते. मृत्यूपत्रात त्यांनी खर्डा येथे समाधी करावी अशी इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र तत्पूवर्प ते परंडा तालुक्यात ३५ वर्षे कार्यरत होते. त्यामुळे तेथील भक्तांनी उंडेगावातच अंत्यसंस्कार करण्याची अाग्रही मागणी केली हाेती. यातून दाेन्ही गावात वाद हाेता.