आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

६ वर्षांच्या अद्वैतला येतात ७ भाषा, पियानो आणि व्हायोलिनचे लंडनमध्ये सादरीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्याचा अद्वेैत नाव सिद्ध करत आहे. तो अनेक कलांमध्ये नैपुण्य राखून आहे. तो सात भाषा जाणतो. उत्तम खेळाडू तर आहेच शिवाय उत्तम जलतरणपटूही आहे, तो मॅरेथॉनमध्ये धावतो. संगीताची अनेक वाद्येही वाजवतो. पण आता तर सेंट मेरी स्कूलच्या क्लास वनच्या या विद्यार्थ्यांने जे केले ते या वयातील मुलांना अशक्यप्राय आहे. अद्वैत चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई पूर्ण केली.तो सहा वर्षे दहा महिने वयाचा आहे. कडाक्याच्या थंडीत असे करणारा तो भारतातील पहिला मुलगा ठरला आहे. चढाईसाठी त्याला १३ दिवसांचा कालावधी लागला. ३ नोव्हेंबर रोजी अद्वेैत भरतियाने १७५९३ फूट उंचीवर बेस
कॅम्पला स्पर्श केला.

अद्वैतची आई पायल हीदेखील ट्रेकर आहे. आधी त्यांनी एकट्यानेच या ट्रेकिंग मोहिमेवर जाण्याचा निश्चय केला होता. पण जेव्हा अद्वैतला कळले तेव्हा त्याने आईकेड येण्याचा हट्ट धरला. शेवटी पायलने सांगितले की, आधी प्रशिक्षण म्हणून दररोज आपल्या चार मजली घराचा जिना २५ वेळा चढावा लागेल.नंतर आई आणि मुलाचा प्रवास नेपाळातील लुक्ला गावापासून सुरू झाला. हे गाव एव्हरेस्ट खोऱ्यात ८९०० फुटांच्या उंचीवर वसलेले आहे. आणि ती शेवटची मानवी वस्ती आहे. पायल सांगतात की, अद्वैतला श्वास घेणे कठीण होत होते. पण तो त्यावरील उपाय नीटपणे समजू शकत नव्हता. रात्री खूपच थकायचा पण तरीही शांत राहायचा. रात्री त्याला खूपच तहान लागायची. मात्र त्याचे इरादे मजबूत होते. अशावेळीही तो म्हणायचा मला आता माउंट किलीमांजारो सर करायचेय. शेवटी त्याने बेस कॅम्प गाठलाच. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे.
बातम्या आणखी आहेत...