आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sixty six year old Granny Runs \'marathon\' In A Saree In Maharashtra

लताबाईंच्या मदतीसाठी सोमवारपासून बँक खाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - पतीवर उपचार करण्यासाठी पैसे हाती यावेत म्हणून वयाच्या 65 व्या वर्षी एका स्थानिक मॅरेथॉन धावून पाच हजारांचे बक्षीस जिंकणार्‍या लता करे यांच्या मदतीसाठी लाखो दानशूर समोर आले आहेत.
‘दिव्य मराठी’ ने यासंबधीचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर दैनिकाच्या राज्यभरातील कार्यालयांत हजारो दानशूरांचे फोन आले. मात्र, लताबाईंच्याकुटुंबीयांपैकी कोणाचेच बँक खाते नसल्याने त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचू शकली नाही. सोमवारी हे बँक खाते खाते उघडले जाईल. बातमी प्रसिद्ध होताच राजकीय नेत्यांनी बारामतीत गर्दी केली. या भेटीगाठीतच शनिवार असल्याने बँका लवकर बंद झाल्या. त्यामुळे लताबार्इंचे खाते उघडता आले नाही. सोमवारी लताबाईंच्यानावाने स्टेट बॅक ऑफ इंडियात खाते उघडल्यानंतर दात्यांना आर्थिक मदत करणे सोपे होईल.