आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदापुरात फळबागा उद्ध्वस्त; एक जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती- वादळी वारे व गारपिटीमुळे रविवारी इंदापूर तालुक्यातील 100 टक्के फळबागा उद्ध्वस्त झाल्या. तसेच निमगाव केतकरी येथे भंगार गोळा करून येणार्‍या महादेव अर्जुन धुमाळ (29) या तरुणाचा गारांच्या मारामुळे मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. बारामती तालुक्यात 7 हजार हेक्टर, तर इंदापूर तालुक्यात 12 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. फळबागांच्या नुकसानीची तीव्रता पाहता त्यांची पुन्हा उभारणी करताना शेतकर्‍याचे कंबरडेच मोडणार आहे. उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केली आहे. शरद पवारांच्या काटेवाडी (ता. बारामती) या गावात सुमारे 300 शेतकर्‍यांनी पंचनामे करण्यासाठी गर्दी केली होती. 26 नोव्हेंबर 2012 रोजी बारामती तालुक्यात गारपीटीने पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामेही झाले, मात्र अजूनही भरपाई मिळाली नसल्याची आठवण उंडवडीचे माजी सरपंच विठ्ठलराव जरड यांनी सांगितले.