आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीबाबत राजकीय पक्षांची पुण्यात कोलांटउडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आराखड्यावरून सुरू असलेल्या राजकीय सुंदोपसुंदीतून अखेर हा अाराखडा सुटला असून केंद्र सरकारकडे पाठवण्याचा मार्ग साेमवारी मोकळा झाला. पुणे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच अाराखड्याला पाठिंबा दिला हाेता. साेमवारच्या विशेष सर्वसाधारण सभेत मनसेच्या नगरसेवकांनीही अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून एेनवेळी विरोध थांबवून या प्रस्तावाला सभागृहात अाश्चर्यकारकरीत्या पाठिंबा दिला. तर सभेपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी महाअारती करून अाराखड्याचे समर्थन केले.

मनपामध्ये विशेष सभा सुरू असतानाच मनपाच्या बाहेर शहर बचाव समितीचे आंदोलन सुरू होते. पुणे मनपा आयुक्त कुणालकुमार यांचे निर्णय चुकीचे असल्याचा आरोप समितीने केला. समितीमध्ये म. वि. अकोलकर, विलास साबळे, किरण मोघे, वैशाली चांदणे, सिद्धार्थ धेंडे, सुजित पटवर्धन यांचा समावेश आहे.
पुण्याच्या बाणेर, औंध, बालेवाडी परिसरात ४० हजार लोक राहतात, उर्वरित पुण्यात लक्षावधी नागरिक आहेत. पण या उपनगरी भागासाठी २८०० कोटी आणि उर्वरित पुण्यासाठी फक्त ७५० कोटींचा प्रस्ताव आहे. तो चुकीचा असल्याचा अाराेप समितीने केला अाहे. या आराखड्याविषयी पुणेकर नागरिकांना पुरेशी कल्पनाच नाही. सर्व तरतुदींसह आराखडा जनतेला खुला करायला हवा, सादरीकरण वृत्तपत्रांतून जाहिरातींतून करणे आवश्यक होते. त्यावर सूचना, हरकती मागवायला हव्या होत्या, अशा अपेक्षाही या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...