आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेजबाबदारपणामुळे पुण्याच्या उद्यानात २० सापांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरी-चिंचवडच्या संभाजीनगर भागातील बहिणाबाई चाैधरी सर्प उद्यानात तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे २० सापांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली अाहे.

सापांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची काेणाकडून हेळसांड न होण्यासाठी विविध ठिकाणी सापडणारे साप या उद्यानात ठेवले जातात. मात्र, सर्प उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुमारे २० सापांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने निसर्गप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
बहिणाबाई चाैधरी प्राणिसंग्रहालयात विविध जातींचे साप नागरिकांना पाहण्यासाठी ठेवले आहेत. संग्रहालयाच्या जवळ बांधकाम सुरू असल्याने सापांना एका बंद काचेच्या पेटीत ठेवण्यात अाले हाेते. तर काही साप प्लास्टिकच्या पिशवीत तसेच लहान साप बंद बाटलीत ठेवण्यात अाले हाेते. मात्र, यात गुदमरून सापांचा मृत्यू झाला. मृत सापांची दुर्गंधी सुटल्यानंतर हा प्रकार रविवारी उघडकीस अाला. दरम्यान, याेग्य निगा न राखल्यानेच सापांचा मृत्यू झाला असून याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी, सर्पमित्रांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...