आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Health: Mobile Pornography Increases Illemanner

विदेशी साइट्सद्वारे अश्लीलतेचा व्हायरस, मोबाइल पोर्नोग्राफीमुळे वाढतेय नैतिक अध:पतन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मोबाइल इंटरनेटवरून फोफावत चाललेली पोर्नोग्राफी आणि नैतिक दबावाचा अभाव यामुळे राज्याचे सामाजिक आरोग्य झपाट्याने बिघडू लागले आहे. वाढत्या लैंगिक अत्याचारांमागे मोबाइलच्या माध्यमातून स्वस्तात आणि कुठेही उपलब्ध होणा-या पोर्नोग्राफीचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी आणि मोबाइल इंटरनेट वापरणा-यांची संख्या या दोन्हीचे वाढते प्रमाण या तर्काला दुजोरा देणारे आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्याची 93 वर्षांची वृद्धा असो किंवा पुणे जिल्ह्यातली 10 वर्षांची बालिका... गेल्या पंधरवड्यात या दोघीही वासनांधांच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या. मुंबईच्या शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली. नागपुरातल्या एका पतीने स्वत:च्याच पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर टाकले. वानगीदाखल नमूद केलेले हे लैंगिक अत्याचार राज्यात कधी नव्हे इतक्या संख्येने वाढले आहेत. महाराष्ट्रातल्या बालिका, तरुणी, स्त्रिया एवढेच काय, वृद्ध बायकादेखील सुरक्षित राहिलेल्या नाहीत.