आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांची लाच; उपायुक्त वैद्य यांना ‘एसीबी’ने सापळा रचून केले अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नांदेड जिल्ह्यातील शिक्षण संस्थेतील शिक्षकाची पदे कायम ठेवण्यासाठी दाेन लाखांची लाच घेताना पुणे समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव रुखमाजी वैद्य आणि शिपाई नरहरी सोनबा तेली यांना ‘एसीबी’ने मंगळवारी सापळा रचून अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, सदर संस्थेद्वारे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे १९९२ पासून शासनाच्या मान्यतेनुसार प्राथमिक अाश्रमशाळा सुरू अाहे. २००९-१० मध्ये शाळेत चार शिक्षक व एका स्वयंपाक्याची नियुक्ती करण्यात आली. या संबंधित मान्यतेसाठी संस्थेने नांदेडच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे रीतसर प्रस्ताव पाठवला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी मार्च २०१३ मध्ये लातूर समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे प्रस्ताव सादर केलेले अाहेत. तेव्हा माधव वैद्य हे लातूरमध्ये कार्यरत होते. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता देत पदे िनयमित करण्यासाठी उपायुक्त माधव वैद्य यांनी लाखाे रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार, तक्रारदारांनी आधीच दहा लाख रुपये दिले होते. मात्र, वैद्य यांनी त्यांच्याकडून पुन्हा दाेन लाख रुपयांची मागणी केली हाेती. त्यामुळे संस्थाचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली हाेती.
शिपायाकरवी पैसे घेताना अडकले
शिक्षण संस्थाचालकाकडून यापूर्वीच १० लाख स्वीकारल्यानंतर माधव वैद्य यांची ४ जुलै रोजी लातूरहून पुण्यास बदली झाली. मात्र, नियुक्तीचा तिढा कायम असल्याने तक्रारदाराने प्रलंबित कामासाठी वैद्य यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार, वैद्य यांनी तक्रारदारास पुण्याच्या कार्यालयात बोलावून आणखी दाेन लाख रुपयांची लाच मागितली. दरम्यान, कार्यालयीन शिपाई नरहरी तेली यांच्यामार्फत लाचेची रक्कम स्वीकारत असताना एसीबीने त्यांना रंगेहाथ अटक केली.
बातम्या आणखी आहेत...