आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथाची माय सिंधुताईंचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी; यासाठी केले पोटच्या मुलीलाही दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनाथाची माय म्हणून सिंधूताई सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. - Divya Marathi
अनाथाची माय म्हणून सिंधूताई सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
पुणे- अनाथाची माय असा राज्यभर नावलौकिक असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा येथे झाला. आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे कार्य त्या करत आहेत. समाजाने धूडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने, प्रेमाने आपलास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे जीवन कोणालाही थक्क करणारे आहे. वैयक्तिक आयुष्यातील दुखाचे डोंगर दूर सारत दुसऱ्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताईचा जीवनपट खरेच प्रेरणादायी आहे.
 
 
लहानपणीच झाले लग्न

- रुढी आणि परंपरांमुळे त्यांना 4 थीतच शिक्षण सोडावे लागले.
- वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचे लग्न त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसोबत करण्यात आले होते.
- त्याच्या पुढील शिक्षणास त्यांच्या घरातील व्यक्तींचा विरोध होता.
- त्या गर्भवती असताना त्यांना मारहाण करण्यात आली आणि घराबाहेर काढण्यात आले.
- त्यांनी अनेक महिने हे रस्त्यावर काढले आणि एका गोठ्यात बाळाला जन्म दिला.
- त्यांनी 3 वर्ष रेल्वेत भीक मागितली आणि आपल्या चिमुकलीचे पालनपोषण केले.
 
 
अशी मिळाली प्रेरणा
- एक दिवस रेल्वे स्थानकावर त्यांना एक चिमुकला मिळाला. तेथूनच त्यांना या चिमुकल्यांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली.
- त्यांनी सुरु केलेल्या या कामाचा आता वटवृक्ष झाला आहे.
- सिंधूताईंच्या आश्रमात अनाथ हा शब्द वापरण्यात येत नाही. लहान मुले त्यांना ताई म्हणतात.
- या आश्रमात विधवा महिलांनाही आसरा देण्यात येतो. त्या मुलांसाठी जेवण बनवतात आणि त्यांची देखभाल करतात.
- अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला त्यांनी अनाथआश्रमात ठेवले.
 
 
36 सूना आणि 272 जावई
- सिंधूताईच्या आश्रमात राहणाऱ्या मुलांच्या पालन-पोषणाचा, शिक्षणाचा आणि आरोग्याचा खर्च सिंधूताईच करतात.
- रेल्वे स्थानकावर सापडलेला पहिला मुलगा हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. तो बाल निकेतन, महिला आश्रम, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल, वृध्दाश्रम याचे कामकाज पाहतो.
- सिंधूताईंनी आतापर्यंत 272 मुलींचा विवाह केला आहे. त्यांच्या कुटुंबात 36 सूना देखील आल्या आहेत.
 
 
सिंधूताईंना मिळालेत 500 पुरस्कार
- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे 500 पुरस्कार सिंधूताईंना आतापर्यंत मिळाले आहेत. पण गरज पडल्यास आजही त्या समाजाची मदत घेतात.
- त्यांच्या म्हणण्यानुसार समाजाच्या मदतीने कुणाचे जीवन उभे राहत असल्यास अशी मदत मागण्यास काहीच हरकत नाही.
- गतवर्षी सिंधूताईंना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या हस्ते आयकॉनिक मदर हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.
- त्यांच्या जीवनावर मी वनवासी ही मालिका आणि मी सिंधूताई सपकाळ हा चित्रपट निर्माण झाला आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...