आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Society Should Not Give Importance To Alcoholic Habbits

समाजाने व्यसनांची प्रतिष्ठा कमी केली पाहिजे : अवचट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- समाजात पूर्वी आदरातिथ्याचे प्रकार वेगळ्या स्वरूपाचे होते. मात्र, कालानुरूप यात बदल झाले असून आता व्यसनांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. थोडा कालावधीसाठी ही व्यसने मनुष्याला आनंद देतात. मात्र, त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत असतो. त्यामुळे या व्यसनांची प्रतिष्ठा समाजाने कमी केली पाहिजे, असे मत मुक्तांगणचे संचालक डॉ.अनिल अवचट यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे पोलिस आयोजित जागतिक अमली पदार्थ विरोधी जनजागरण कार्यक्रम समारोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री प्राजक्ता माळी, पोलिस आयुक्त गुलाब पोळ, व मुंक्तागणच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होते.

अवचट म्हणाले, मुक्तांगण सुरू केले तेव्हा पु.ल.देशपांडे यांनी आर्थिक मदत केली व सदर केंद्र लवकर बंद व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. मात्र, समाजात व्यसनांचे प्रमाण वाढल्याने सदर केंद्रात येणार्‍यांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. व्यसनांना आहारी जाणार्‍या तरुणांची संख्या वाढत असून त्यांनी स्वत:ला यापासून वाचवले पाहिजे. दरम्यान, मी दारू पीत नाही अथवा सिगारेट ओढत नाही. कोणी व्यक्ती दारू पीत नाही म्हणजे त्यात काहीतरी गडबड आहे. हा चुकीचा संदेश मिटवून सर्वांनी व्यसन करत नाही हे ठणकावून सांगितले पाहिजे, असे अभिनेता स्वप्निल जोशी याने बोलताना सांगितले. या वेळी पुणेकरांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती.