आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात तासांच्या प्रयत्नांनी बोअरवेलमधून सोहमला वाचवण्यात यश, पुण्यात उपचार सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफ पथकाच्या अथक परिश्रमांनंतर बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढलेल्या सोहमसोबत पोलिस कर्मचारी व कुटुंबीय. - Divya Marathi
आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफ पथकाच्या अथक परिश्रमांनंतर बोअरवेलमधून सुखरूप बाहेर काढलेल्या सोहमसोबत पोलिस कर्मचारी व कुटुंबीय.
पुणे- पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे शेतातील बोअरवेलच्या १८ फूट खाेल खड्ड्यात पडलेल्या दोन वर्षांच्या सोहम यादव याला पावणेसात तासांनंतर गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजता सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आले. दरम्यान, सोहम याला उपचारासाठी पुण्यातील केर्इम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर साेहम प्रचंड घाबरला असून त्याला उपचाराची गरज असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. सोहम हा बोअरवेलमध्ये पडल्यानंतर तातडीने प्रशासनाने त्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली होती.

एक पोकलेन मशीन, दोन जेसीबी मशीन, रुग्णवाहिका, अग्निशामक दल घटनास्थळी येऊन त्यांनी मदतकार्य केले. अग्निशामक दलाचे जवान व एनडीआरएफच्या जवानांनी बोअरवेलला समांतर खड्डा खोदून सोहमला सुखरूप बाहेर काढले.

बातम्या आणखी आहेत...