आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solapur\'s Ncp Leader Gurunath Katare Murder Case, Former Mla\'s Son Involved Police

कटारे हत्या प्रकरणाला राजकीय वळण, माजी आमदारपुत्राने सुपारी देऊन घडविली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: मृत गुरुनाथ कटारे)

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या खून प्रकरणात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा मुलगा रमेश पाटील यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून भाजपच्या तिकीटावर उभे राहिलेले वडील सिद्रामप्पा पाटील यांना निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सुपारी देऊन हत्या केल्याचे तपासात उघड होत आहे. दरम्यान, या घटनेनंतर रमेश पाटील फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आपल्या वडिलांचाच प्रचार करणारे व त्या भागातील प्रतिष्ठित गुरुनाथ कटारेंचा खून झाल्यास विरोधी उमेदवाराच्या विरोधात संताप व्यक्त होईल व नागरिक वडील सिद्रामप्पा पाटलांना मतदान करतील या हेतूने रमेश पाटील याने 50 लाखांची सुपारी देऊन कटारेंची हत्या घडवून आणल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी प्रमोद ऊर्फ किंगभाई प्रकाश स्वामी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याबरोबर त्याचे तीन सहकारी जगदीश उर्फ पिंट्या रत्नाकर कोन्हेरीकर, प्रदीप उर्फ दीपक उर्फ प्रभाकर मठपती, शरद महानंद शिंदे हे पोलिस कोठडीत आहेत. या तिघांना आज अक्कलकोट सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा मुलगा रमेश फरार असून त्याचा दोन दिवसानंतरही शोध लागला नसल्याची माहिती साहाय्यक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली आहे.

गुरुनाथ कटारे यांचा खून कशासाठी आणि का करण्यात आला, याचा अधिकृत उलगडा झाला नाही. त्यामुळे रमेश पाटील यांना अटक करून चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उजेडात येईल असे पोलिसाचे म्हणणे आहे. त्यामुळे रमेश पाटलाची अटक महत्त्वाची मानली जात आहे.

पुढे वाचा, आमच्याच माणसाचा खून आम्ही कसा करू?- माजी आमदार सिद्रामप्पा पाटलांचा सवाल...