आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Somnath Giram Brand Ambassador For 'Earn And Learn'

सोमनाथ गिराम बनला ‘कमवा आणि शिका’चा ब्रँड अॅम्बेसेडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यात चहा विकून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत चार्टर्ड अकाउंटंटची (सीए) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ गिरामला ‘कमवा व शिका' योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी पुण्यात ही घोषणा केली. सोमनाथच्या संघर्षाच्या कहाणीचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध झाले होते.

‘दिव्य मराठी’चे आभार मानत सोमनाथ म्हणाला, माझ्यासारख्या सामान्याला हा बहुमान मिळाला, याचा खूप आनंद आहे. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मात केली तर आपले ध्येय प्राप्त करण्यास कोणीही रोखू शकत नाही याचा मला प्रत्यय आला आहे.