आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पुन्हा हादरले..पॉपर्टीवरून पोटच्या मुलाने केली वयोवृद्ध आईची निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्‍ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आई- मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पॉपर्टीवरून पोटच्या मुलाने वयोवृद्ध आईची निर्घृण हत्या केली आहे. एरंडवणा भागातील गणेश नगरातील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. अरुणा मनोहर सकपाळ असे मृत महिलेचे नाव आहे.

 

आरोपी आनंद मनोहर सकपाळ (वय- 43) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे हे प्रकरण?
आनंद आपल्या वयोवृद्ध आईला सतत मारहाण करत होता. हत्येच्या दिवशीही त्याने आईला बेदम मारहाण केली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. आई उठत नसल्यामुळे आनंद यानेच पोलिसांना फोन करून सांगितले होते.

 

अरुणा सकपाळ यांच्या छातीवर जखमा
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अरुणा सकपाळ यांच्या छातीवर जखमा आढळल्या आहेत. आरोपी मुलाने आईच्या छातीवर वजनदार वस्तू मारली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आई-मुलामध्ये पॉपर्टीवरून सतत भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. आरोपी मुलाने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... पुण्यात विकृत इंजिनिअरकडून आई, वडिलांची गळा चिरून हत्या

बातम्या आणखी आहेत...