आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने चाेेरले दागिने वडिलांनी केले परत, पुण्यातील गणपतीचे दागिने सापडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील प्रसिद्ध मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरातील श्रींच्या मूर्तीचे दागिने ज्याने लांबवले, त्याच्या वडिलांनी मात्र तो चोरीचा एेवज शुक्रवारी प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा केला. या प्रकरणातील चाेरटा तानाजी नारायण कुंडले (रा. कोथरूड) याला पोलिसांनी गुरुवारी दुपारी न्यायालय परिसरात अटक केली. अतिशय नाट्यमयरीत्या या चाेरीची उकल झाली.

बुधवारी पहाटे मंडई परिसरातील अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजानन मंदिरातील मूर्तीवरील सुमारे ४३ लाख रुपयांचे दागिने चाेरट्याने लंपास केले हाेते. ही चाेरी करताना अाराेपी तेथील सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झाला होता. त्याआधारे पोलिसांनी रेखाचित्र जारी करून कसून तपास चालवला होता. दुसरीकडे या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साेशल मीडियावर सीसीटीव्हीचे फुटेज टाकून अाराेपीची माहिती देण्याचे अावाहन गणेशभक्तांना केले हाेते. मंडई मंदिराचे पुजारी श्रीपाद कुलकर्णी यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत फिर्यादही दाखल केली हाेती. त्यानुसार अज्ञात अाराेपीविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता.

प्रामाणिक वडील
आरोपी तानाजीला गांजाचे व्यसन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचे वडील नारायण कुंडले हे रिक्षा चालवतात. अापल्या रिक्षात विसरलेल्या गोष्टी प्रामाणिकपणे परत करण्याबद्दल यापूर्वी त्यांचा सत्कारही झाला होता. अापल्या मुलाच्या गुन्ह्यावर पांघरून न घालता अाताही त्यांनी प्रामाणिकपणे दागिने पाेलिसांच्या स्वाधीन केले, याबद्दल त्यांचे काैतुक हाेत अाहे.

दागिने घातलेला मुलगा दारात
गणपती मंदिराचे दागिने चाेरणारा तानाजी दारूच्या नशेत होता. चोरलेले दागिने अंगावर घालूनच तो गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरी पोहोचला. वडिलांनी दार उघडताच अापल्या मुलाच्या अंगावर एवढे साेन्याचे दागिने पाहून ते चकितच झाले. मुलगा नशेत हाेता, त्यामुळे कितीही विचारपूस केली तरी ताे काही सांगण्याच्या स्थितीत नव्हता. वडिलांनी त्याला पकडून काेंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे काही दाद देत नव्हता. मात्र, या प्रकाराने घाबरून गेलेल्या वडिलांनी तानाजीकडील दागिने काढून घेतले व नंतर ताे घराबाहेर पडला. एवढा माैल्यवान एेवज तानाजीने कुठून अाणला, असा संशय अाल्याने वडिलांना रात्रभर झाेप अाला नाही. त्यांनी सकाळीच उठून हा एेवज पाेलिस ठाण्यात सुपूर्द केला. ताेपर्यंत त्यांनाही हा एेवज गणपती मंदिराचा असल्याची कल्पना नव्हती. अखेर पाेलिसांनीच त्यांना याबाबत कल्पना दिली, अशी माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक नितीन भाेसले यांनी दिली.

नळाच्या ताेट्या चाेरताना पकडला
दागिने सापडले तरी अाराेपी तानाजी मात्र फरार हाेता. कुटुंबीयांनाही ताे कुठे अाहे याची कल्पना नव्हती. गुरुवारी दुपारी शिवाजीनगर कोर्ट परिसरात अज्ञात व्यक्ती नळांच्या तोट्या चाेरत असल्याचे काही जणांनी पाहिले. पाेलिसांना कल्पना दिली असता त्याला तातडीने ताब्यात घेण्यात अाले. चाैकशीअंती हाच दागिने चाेर तानाजी असल्याचे उघडकीस अाले. तानाजीने गणपतीचे एकूण ४३ लाखांचे दागिने चाेरले हाेते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या वडिलांनी पाेलिसांत जमा केलेला एेवज सुमारे १८ लाखांचाच अाहे. उर्वरित २५ लाखांचा एेवज तानाजीने कुठे दडवला, या चाेरीत त्याच्यासाेबत अन्य कुणी हाेते का? याची माहिती पाेलिस घेत अाहेत. दरम्यान, शुक्रवारी तानाजीला न्यायालयात हजर करण्यात येणार अाहे.
छायाचित्र: अाराेपी विजय कुंडले