आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्या-हिरा, संज्या-सैतान तुकोबांची पालखी वाहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आषाढी वारीचे दिवस जवळ आले की, पालखी रथाला जोडल्या जाणाऱ्या बैलजोड्यांची उत्सुकताही भाविकांमध्ये असते. या उत्सुकतेचे उत्तर श्री तुकाराम महाराज संस्थान कमिटी, देहू यांनी बुधवारी दिले आहे. तुकोबांच्या पालखी रथासाठी सोन्या-हिरा आणि संज्या-सैतान या बैलजोड्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त अशोक मोरे यांनी दिली.
तुकोबांचा पालखी सोहळा २७ जूनला मार्गस्थ होणार आहे. त्यापूर्वी महिनाभर संस्थानच्या वतीने पालखी रथाला जोडायच्या बैलजोड्यांचा शोध घेतला जातो. सध्या त्यासाठी बैलजोड्यांचे मालक संस्थानकडे अर्ज करतात. आलेल्या अर्जांची छाननी करून निवडलेल्या जोड्या संस्थानची समिती प्रत्यक्ष पाहून येते आणि त्यानंतर निवड केली जाते, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

यंदा सात जणांच्या समितीने दहा बैलजोड्यांची पाहणी करून दोन जोड्या निवडल्या आहेत. हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील पंढरीनाथ तुकाराम पठारे यांची सोन्या-हिरा ही बैलजोडी आणि वडगाव मावळ येथील बाबूराव आबाजी वाईकर यांची संज्या-सैतान ही बैलजोडी निवडण्यात आली आहे.
पुढे वाचा..
बातम्या आणखी आहेत...