आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला चांगल्या लोकांची गरज, त्यांनाच निर्भयपणे मतदान करा- श्री श्री रविशंकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देशाला चांगल्या लोकांची गरज आहे, देश प्रगतिपथावर नेण्यासाठी चांगली पार्श्वभूमी असलेल्या लोकांनाच मतदान करून गुन्हेगार प्रवृत्तीच्या उमेदवारांना मते देवू नका, असे आवाहन आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी बालेवाडी येथील देशभक्तीपर महासत्संगात केले.
ते पुढे म्हणाले, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून इतरांनाही मतदान करण्यास जागृत करावे. कारण ही एक मोठी देशसेवाच आहे व ईश्वरसेवा व देशसेवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशाला मजबूत बनविण्यासाठी व मजबूत आर्थिक प्रगतीसाठी मजबूत सरकारची गरज आहे. सेंद्रिय शेतीचा प्रसार देशभर झाला पाहिजे. देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मसम्मान जागृत करून निराशेतून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे कारण तेच ह्या देशाचे खरे अन्न दाता आहेत, असेही मत श्री श्री रविशंकर यांनी मांडले.
'व्हॉलेंटियर फॉर बेटर इंडिया'तर्फे देशभर केलेल्या प्रयोगांची व नदी सफाई अभियानाची माहिती त्यांनी सांगितली. व्यसनामुळे बहुतेक स्त्रियांना पुरुषांकडून जाच होत असतो. व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी काम केले पाहिजे व स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे वाचा, पुणे व परिसरातील कोणत्या-कोणत्या लोकसभेच्या उमेदवारांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट...